अनिल देशमुखांना जामीन पण सुटका नाही?

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना तब्बल ११ महिन्यांनंतर जामीन मिळालेला आहे. अनिल देशमुखांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाने गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण केली आणि आज निकाल देताना जामीन मंजूर केला. पण त्यांच्या सुटकेवर संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण त्यांच्यावर अगोदरच CBI कडून गुन्हा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना CBI कडून दाखल गुन्ह्यातही लगेच जामीन मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे आणि CBIच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितली होती असा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनीच पत्रातून तसे आरोप केले होते. या प्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल करून CBI चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.