गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी..रोहीत पवारांचे ट्विट चर्चेत !

वेदांता फॉक्सकॉन  प्रकल्प गुदरातमध्ये गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची राळ उठविण्यात आली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आणखी एक धक्कादायक बातमी म्हणजे आता  PhonePe या दिग्गज कंपनीनं महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने जाहिराती द्वारे दिलेली आहे. सोशल मीडियावर यावर जोरदार हल्लाबोल होत असताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, वा रे सत्ताधारी. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय.फोन पे ने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. फोन पे आपले कार्यालर कर्नाटकात घेवून जात असल्याने सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.