राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट, मोठं कारण आलं समोर !

शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. खरंतर या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली पण खरंतर ही भेट राजकीय नव्हती. कोल्हे यांच्या आगामी शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटासाठी शहा यांची भेट घेतली असे समोर आलेले आहे. या भेटीनंतर स्वतः अमोल कोल्हे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिलेली आहे.
माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली,@AmitShah pic.twitter.com/z1X8Zr6uqE
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 1, 2022
या भेटीत कोल्हे यांनी अमित शहा यांना चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी आमंत्रण दिले, आणि उपस्थित राहण्याची विनंतीही केली आहे. शहा यांनी प्राथमिक होकार दिलेला आहे. या भेटीत महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी, सध्याच्या स्थितीविषयी चर्चा झाल्या आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली आणि दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. या चित्रपटाद्वारे देशाचे लक्ष वेधावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश आहे असे कोल्हे यांनी सांगितले.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील सर्वच मंत्र्यांनी आणि सर्व खासदारांनी हा चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.
त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश! #ShivpratapGarudjhep#Garudjhep5Oct2022#Shivpratap
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 1, 2022