मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे ?‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!

राज्यातील एक मोठी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार चिरंजीव सांभाळतात असा आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केलाय.

 रविकांत वरपे यांनी यासंदर्भातील एक फोटो ट्विट केला असून हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असा प्रश्न देखली विचारला आहे. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले असल्यामुळे किंवा दहीहंडी, गणेशोत्सवात व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार चिरंजीव श्रीकांत शिंदेंकडे सोपवला असेल असा संशय मला येतो आहे असेही वरपे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानामध्ये जे शासकिय कार्यालय आहेत तेथील हा फोटो आहे. श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत त्याच्या मागे राज्यशासनाचा लोगो लावलेला आहे या गोष्टीसुद्धा वरपे यांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्या आहे. आता मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून काय उत्तर येते ते पहावे लागेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.