पीएफ खात्यातून रक्कम काढायची आहे? ई-नॉमिनेशन केलं का?

तुम्ही पीएफ खातेदारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीएफ खातेदाराला ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे तुम्ही ई-नॉमिनेशन केलं नसेल तर तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येणार नाही. तुम्हाला खात्यातील बँलन्सही तपासता येत नाही. त्यामुळे ई-नॉमिनेशनची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा. घाबरून जावू नका ई-नॉमिनेशन करणे अत्यंत सोपे आहे त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही.तुम्हाला ऑनलाईन हे काम करावे लागेल. 

पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खातेदाराच्या वारसांना, कुटुंबियांना ई-नॉमिनेशनअतंर्गत सामाजिक सुरक्षा मिळते.EPFO खातेदारांना वारसांची माहिती देण्यासाठी ई-नाॉमिनेशनची सुविधा देण्यात येते. पीएफ खातेदाराने ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत दावा दाखल करु शकतात. तसेच पीएफ खात्यातील रक्कम काढणे त्यांना सोपे होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येते.जर विना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात आणि कोर्टात दाद मागावी लागते. 

ई-नॉमिनेशन कसे करावे?

खातेधारकाने ईपीएफओच्या www.epfindia.gov.in संकेतस्थळाला जावे. खातेधारकांनी  ‘Service’ हा पर्याय निवडावा ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करावे. आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा. सॅलरी स्लीप वर UAN क्रमांक असतो. ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करा. तुम्ही लॉगिन करानॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा. त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा. family declaration हा पर्याय निवडा. ‘Add Family Details’ काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा. ‘Nomination Details’ हा कॉलम भरा. ‘Save EPF Nomination’ हा पर्याय निवडा. ‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यानॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.