नीरज चोप्राचं ‘सुवर्ण पदक’ हुकलं ! कारण…

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य भरारी घेतल्यानंतर नीरज चोप्राचं सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र त्याचबरोबर अनेकजण त्याला सुवर्ण पदक का मिळालं याबद्दल चर्चा करत आहेत. यावर नीरजने प्रतिक्रिया दिलेली आहे. वाऱ्याचा वेग माझ्या विरोधात होता त्यामुळे मला चांगली सुरुवात करता आली नाही. चौथ्या फेरीत मी गेलो पण माझ्या मांडील खूप वेजना जाणवत होत्या. त्यामुळे पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण मला फारसे यश आले नाही. तरीह मी खुष आहे. मी पुढे अजून मेहनतीने खूप प्रयत्न करेन. पुढच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करेन असेही नीरज चोप्राने स्पष्ट केले. 

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेकीत गोल्ड मेडल मिळविणाऱ्या अँडर्सन पीटर्सचे नीरजने तोंडभरुन कौतुक केले. नीरज म्हणाला, पीटर्सनं मला अगदी कडवी झुंज दिली. त्याने उत्तम कामगिरी केली. मी खूप प्रयत्न केले पण मला सुवर्णपदक मिळवता आलं नाही. पीटर्सनं तब्बल 90 मीटर्सपर्यंत भाला फेकला हे पाहताना खूप सोपे वाटते पण अजिबात तसे नाही. जर वाऱ्याचा वेग विरुद्ध दिशेला असेल आणि तुमच्या शरीराने साथ दिली नाही तर ही गोष्ट सहज शक्य नाही. पीटर्सनं सलग दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूला हरवले आहे. 

दरम्यान जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमधील पदकांचा दुष्काळ नीरजने संपवला आहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पजक मिळवणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरलेला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.