‘बॉयकॉट’ इंडियन आयडॉल ! नेमकं कारण तरी काय?

बॉलिवूडमध्ये सुरु असलेला बॉयकॉट ट्रेन्ड आता टेलिव्हीजनवर आलेला आहे. ‘इंडियन आयडॉल’बाबत वाद सुरू हा शो बंद करा असे चाहते म्हणत आहेत. ‘इंडियन आयडॉल’चा 13व्या सीझन सुरु असून त्यात ऑडिशनसाठी आलेल्या रिटो रिबाची निवड न झाल्याने प्रेक्षक संतापले आहेत आणि सोशल मीडियावर शो बंद करा असे म्हणत जोरदार टीका होते आहे.  

टेलिव्हीजनवरील रिएलिटी शोने अनेकांचे आयुष्य मार्गी लावले. खूप चांगले कलाकार या गाण्यांच्या स्पर्धेतून सीनेकला क्षेत्राला मिळाले. नवोदित गायकांना एक चांगल व्यासपीठ मिळालं.  ‘इंडियन आयडॉल’ हा त्यापैकी एक कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमामुळे अनेकांचे करिअर घडले पण आता या कार्यक्रमाची रया गेलेली आहे. या स्पर्धात्मक कार्यक्रमांचे स्वरूप बदलले असून टॅलेंट हंट कमी आणि फक्त टीआरपीकडे लक्ष दिला जातोय असा आरोप सुरु झालाय.

नुकतीच ‘इंडियन आयडॉल सीझन 13’च्या टॉप 15 स्पर्धकांच्या नावाची घोषणा सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर करण्यात आली. या यादीत रिटो रिबाचे नाव नसल्यामुळे चाहते संतापले आहेत. आता प्रश्न पडला असेल हा कोण तर हा रिटो रिबा अरुणाचल प्रदेशातील गायक आणि संगीतकार आहे. त्याचं स्वतःचे YouTube चॅनल असून लाखांमध्ये सबस्क्रायबर आहेत. ‘इंडियन आयडॉलच्या 13’व्या सीझनमध्येही तो ऑडिशनसाठी आला होता. त्याने ऑडिशन दिले. परिक्षकांनी त्याला स्वतः लिहीलेलं गाणं ऐकवायला सांगितलं त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चाहत्यांना ते गाणं आवडलं. पण रिटोला शोमध्ये एन्ट्री न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत आणि तेव्हा पासून बॉयकॉट  ‘इंडियन आयडॉल ट्रेन्ड सुरु झालाय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.