रिक्षा ड्रायव्हर ते स्टँण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची कहाणी !

सुप्रसिद्ध स्टँण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेल्या ४० दिवसांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता पण त्यांची झुंज अपयशी ठरली. १० ऑगस्टला दिल्लीत जिममध्ये व्यायाम करताना राजू श्रीवास्त यांच्या छातीत दुखू लागल्याने ट्रेडमिलवरच कोसळले होते. त्यानंतर त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवरच होते. त्यांची प्रकृती सुधारेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती पण आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गजोधर आणि राजू भैया म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. 

२५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना बलाई काका म्हणत. राजू सुरवातीपासून नक्कल फार उत्तम करत असल्याने त्यांना कॉमेडियनच व्हायचे होते. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आणि थेट मुंबई गाठली. मनोरंजन क्षेत्रात काम करताना उदरनिर्वाहासाठी काही काळ त्यांनी रिक्षा चालवली होती. एन चंद्रा यांच्या तेजाब सिनेमात राजू श्रीवास्तव यांनी काम केलं त्यांनतर मैने प्यार किया, बाजीगर, आये आठवा खदानी रुपया, बिग ब्रदर, मै प्रेम कि दिवानी हू बॉम्बे टू गोवा या चित्रपटात ते दिसले पण त्यांना खरी मिळाली ती स्टँडअप कॉमेडियन म्हणूनच. अगदी सुरवातीच्या काळात विनोदी कार्यक्रमांचे त्यांना अवघे ५० रुपये मिळत. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमातून त्यांनी विनोदी जगात पाऊल ठेवले. राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. प्रेक्षकांना कायम हसविणारे राजू श्रीवास्तव आज आपल्यात नाहीत पण त्यांचा विनोदी टाईमिंगमुळे ते कायम लक्षात राहतील. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.