
New India Co-operative Bank Scam Big scam exposed RBI action
Reserve Bank of India (RBI) ने New India Co-operative Bank वर गंभीर निर्बंध लावले आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे बँकेच्या आर्थिक अस्थिरता. पण ही अस्थिरता निर्माण होण्यामागे बँकेच्या जनरल मॅनेजर, हितेश प्रविण मेहता यांचा 122 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यामुळे ठेवीदारांना पैसे काढता येणार नाहीत आणि बँकेची आर्थिक स्थिती आणखी बिघडली आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या दोन वर्षांत बँकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. मार्च 2024 मध्ये बँकेला 22.78 कोटी रुपयांचा तोटा झाला, तर 2023 मध्ये हा तोटा 30.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या परिस्थितीमुळे RBI ने सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले. पण तपासात एक मोठा घोटाळा समोर आला आहे.
घोटाळा कसा झाला?
हितेश प्रविण मेहता, जो New India Co-operative Bank चा जनरल मॅनेजर होता, त्याच्याकडे दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी होती. त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल 122 कोटी रुपये बँकेच्या खात्यातून हस्तांतरित केले. 2020 ते 2025 या काळात हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या चिफ अकाउंटिंग ऑफिसरने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
RBI ने कोणते निर्बंध लावले?
ठेवीदारांना पैसे काढता येणार नाहीत . बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही. नवीन Fixed Deposits (FDs) किंवा गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही. बँक नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही . Locker मध्ये ठेवलेल्या वस्तू खातेदारांना काढता येणार .बँकेला कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे, वीज बिल यासारखे खर्च करण्यास मंजुरी.
हे निर्बंध 13 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आले असून, सहा महिन्यांसाठी लागू राहतील.
RBI ने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले
RBI ने बँकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. बँकेच्या व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासक आणि सल्लागार कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये RBI चे माजी जनरल मॅनेजर रविंद्र सप्रा आणि CA अभिजित देशमुख यांचा समावेश आहे. सहा महिन्यांनंतर या परिस्थितीचे पुनरावलोकन करण्यात येईल.
ठेवीदारांची चिंता वाढली
या निर्णयानंतर ठेवीदार मोठ्या प्रमाणावर बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करत आहेत. सर्वांना स्वतःचे पैसे मिळतील का? या चिंतेने ग्रासले आहे.