‘आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी हवी असेल तर….’ निलेश राणेंची केसरकरांना ऑफर

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामधील वाद अधिकच चिघळताना दिसतो आहे. पत्रकार परिषद घेवून केसरकरांनी राणे पिता-पुत्र यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर केसरकरांचे प्रवक्ते पद जाणार अशी झालेली चर्चा यामुळे पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाने डोके वर काढलेले आहे.आता निलेश राणे यांनी ट्विट करत केसरकरांना खोचक टोला लगावला आहे. ‘दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे’ असे ट्विट केले आहे.
भाजपच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करु नये ती आम्ही खपवून घेणार नाही अशी भुमिका शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी घेतली होती. याबाबत फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती तरी राणे सुपुत्र सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतच होते. तिथूनच राणे आणि केसरकर वाद जास्त वाढला. निलेश राणे यांनी आधीही केसरकरांना ट्विटच्या माध्यमातून डिवचलं होतं. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे हे विसरू नका.इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका.नाहीतर तुम्हाला माहिती; आहे. आम्ही गप्प बसणार नाही अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला होता.