नितीशकुमार आणि शरद पवार भेट, २०२४ लोकसभा निवडणुकीवर चर्चा?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकिवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येतेय. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच सक्रिय झालेत. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर असून विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दिल्लीमधी पवार यांच्या निवासस्थानी नितीश कुमार यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्ष नेत्यांना एकत्रित आणण्याबाबत चर्चा झाली असावी अशी चर्चा रंगलेली आहे.
पवार यांची भेट घेण्यापूर्वी नितीश कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांना भेटले होते. बिहारमध्ये आरजेडी सोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार हे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र या चर्चला त्यांनीच पूर्णविराम दिलाय. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही. तसेच ते यासाठी इच्छुकही नाही. त्यांचे लक्ष भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्रित आणणे आहे.
नितीशकुमारांनी दिल्ली दौऱ्यात मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली त्यावेळी सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही तेथे उपस्थित होते. नितीश कुमार यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतलेली आहे.