शिवाजी पार्क मैदान कुणालाच मिळणार नाही? विधी विभागाचा अभिप्राय बातम्यांच्या हाती !

सध्या राज्यात एकच चर्चा पहायला मिळतेय शिवाजी पार्क मैदाना दसरा मेळाव्यासाठी कोणाला मिळणार आहे. दरम्यान शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय बातम्यांसमोर आला आहे त्यात खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या कोर्टात प्रलंबित आहे असे विधी विभागच मत आहे. त्यामुळे शिंदे किंवा ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याची माहिती सुत्रांकडून समजलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पालिका प्रशासन हे संभ्रमात आहे कारण खरी शिवसेना कोण हाच प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर कोणताही न्याय झालेला नाही. ज्या गोष्टी कोर्टात प्रलंबित आहेत त्या गोष्टी आणि त्याच्याशी संबंधित अर्जांवर निर्णय घेण्याचा अधिकार हा पालिका प्रशासनाला नाही. म्हणून विधी आणि न्याय विभागच असं म्हणणं आहे की, या दोन्ही अर्जांवर तूर्तास कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असा विचार पालिका करते आहे.
सूत्रांनी सागितलं की, परवानगी न देण्याचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटात तणाव पहायला मिळतो आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हा मुद्दा आता संवदेनशील होत चालला आहे तेव्हा कायदा, सुव्यवस्था आणि शांतता यांचा प्रश्न गंभीर होवू शकतो म्हणून मुंबई पोलिसांकडूनही मत मागितलं जाऊ शकत. आता येत्या काही दिवसात विधी व न्याय विभाग आपला अहवाल आयुक्तांसमोर सादर करेल.