
Non-Vegetarian vs Vegetarian: Who exactly is more likely to be vitamin B-12 deficient?
आजकाल अनेकजण शाकाहाराला प्राधान्य देत आहेत, मात्र त्याचा परिणाम Vitamin B-12 च्या कमतरतेवर होऊ शकतो.
Vitamin B-12 चे महत्त्व
हे जीवनसत्व रक्तनिर्मिती आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे. याची कमतरता झाल्यास थकवा, अशक्तपणा, त्वचेचा पिवळसरपणा आणि भूक मंदावणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
शाकाहारी आहार आणि B-12 ची कमतरता
Vitamin B-12 प्रामुख्याने प्राणी-आधारित पदार्थांमध्ये आढळते. त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये त्याची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. जरी संपूर्ण धान्य, सोया दूध आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये काही प्रमाणात हे जीवनसत्व असले, तरीही ते पुरेसे ठरत नाही.
B-12 ची कमतरता भरून कशी काढावी?
शाकाहारी लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार, सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन्स घेणे गरजेचे आहे. योग्य पोषण घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
(महत्वाची टीप: वरील माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)