‘जॅकलीन’पाठोपाठ बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत !

मनी लाँड्रिंग वादात अडकलेल्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर आता मॉडेल डान्सर नोरा फतेही हिच्यामागेही दिल्ली पोलिसांचा ससेमिरा लागला. सुकेश चंद्रशेखरशी निगडीत २०० कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नोराची ७ तास कसून चौकशी केलीय. हे प्रकरण उघड होताच सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरू झालीय.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसपाठोपाठ आता डान्सर, मॉडेल-अभिनेत्री नोरा फतेही हिलाही दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावावी लागली. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणी नोराची पोलिसांनी ७ तास कसून चौकशी झाली. नोराची पोलिसांनी नेमकी काय चौकशी केली ही माहिती गुप्त ठेवण्यात आलीय. पुन्हा नोराला बोलवण्यात येईल असं सांगून तिला जाण्याची परवानगी देण्यात आली. याच प्रकरणी जॅकलीन फर्नांडीस हिलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं, आता नोरानंतर पुन्हा जॅकलीनला पोलिसांचा आदेश येऊ शकतो असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्यासंदर्भात पोलिसांना काही पुरावे सापडलेत. जे नोरा फतेहीच्या बाबतीत लागू पडत असल्याने चौकशी करण्यात आल्याचे पोलिस अधिकारी रवींद्र यादव यांनी स्पष्ट केलं. नोराने पोलिसांना सहकार्य केलं असलं तरी काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नोराकडून मिळाली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.या प्रकरणावर ईडीचीही नजर असल्याने नोरा आणि जॅकलीन यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.