ललित मोदी सोबतच्या नात्यावर, सुष्मिताची पोस्ट व्हायरल

फरार उद्योगपती ललित मोदीनं ट्वीट करुन अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करत एकचं धक्का दिला. दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या.मात्र लग्न केलं नाही, आम्ही फक्त डेट करतोय, असं ललितनं स्पष्ट केलं. यावर आता पहिल्यांदाच सुष्मितानं तिच्या प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. लग्न नाही, साखरपुडा नाही. आजुबाजूला फक्त प्रेम. एवढं स्पष्टीकरण पुरे आहे . आता कामाला लागूया… असं म्हणत सुष्मितानं तिच्या दोन मुलींसोबतचा फोटो शेअर केला आहे. ललित मोदीसोबतच्या नात्यावर यावर सुष्मिता काय बोलतेय, याकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर तिनं पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
सुष्मिता सेन काही महिन्यांपूर्वी रोहमॉन शॉलसोबत डेटिंग करत होती. १५ वर्षांनी तरुण रोहमॉनसोबत तिचं रिलेशनशीप काही दिवसांपूर्वी संपुष्टात आलं. त्यानंतर सुष्मिताने चक्क ललित मोदीसोबत संसार थाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने अद्याप आपल्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन लग्नाची बातमी शेअर केलेली नाही
ललित मोदीची सोशल मीडियावरुन माहिती
मालदीवमध्ये ट्रीप झाल्यानंतर लंडनला कुटुंबांसह परतलो आहे, माझी बेटर हाफ सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळायचा. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, अमाप आनंद होतोय, असं ट्वीट करताना ललितनं नात्याबद्दल खुलासा केला होता.