तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि राज्यात सत्तांतर झालं. शिवसेनेत आता दोन गट पडले एक आहे शिंदे गट तर दुसरा आहे फडणवीस गट ! अगदी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाकडे जाणार हा वाद तर सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. आमदार, खासदार, नगरसेवक अगदी शाखाप्रमुख सुद्धा शिंदे गटाच्या बाजून गेले. आता राज्यात शिवसेनेला पुन्हा उभं करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. आदित्य राज्यभर शिवसंवाद यात्रा घेत असून शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण करत आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे राजकारणात येणार का असा प्रश्न विचारला जातोय.
शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी या विषयावर भाष्य केलंय. प्रधान म्हणाले की,शिवसेना आज, उद्या आणि भविष्याच काम करत राहणार आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी यामुळे ठाकरे कुटुंब दुखावल आहे तरी उद्धव ठाकरे कणखर आहेत. संपूर्ण कुटुंबासह अवघा महाराष्ट्र त्यांच्यासोबत उभा आहे. तेजस यांनी राजकारणात यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण ठाकेर कुटुंबाचा प्रश्न आहे.
शिवसेनेत गटबाजी होतेय याची कल्पना मी साहेबांनी दिली होती पण शिवसैनिक मला धोका देणार नाहीत असे उद्धव ठाकरेंना वाटत होते. आता निवडणूक येवू द्या शिवसेना पुन्हा खंबरीपणे उभी राहील. ठाकरेंनी कधी राजकारण केलं नाही. मराठी माणसे सत्तेमध्ये यावीत म्हणून शिवसेना राजकारणात आलेली आहे. म्हणून तर मराठी माणसाला शिवसेना आजही आपली वाटते. किती ही संकटे आली तरी आम्ही शिवसेनेसोबत राहणार अशी भावना हर्षल प्रधान यांनी व्यक्त केली आहे.