शिवसेना नक्की कोणाची?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. खरी शिवसेना म्हणजे आपणच असा दावा दोघांकडून करण्यात आलाय. दरम्यान शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाणार हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात याचिक दाखल केली होती. या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेणार अशी भीती ठाकरेंना असल्यामुळे त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. आता शिवसेनेच्या या भीतीवर सुप्रीम कोर्ट निरीक्षण नोंदविणार आहे. विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीदरम्यान रमण्णा यांनी “आम्हाला निर्णय द्यावाच लागेल”, मत देखील नोंदवलं आहे.
सरन्यायाधीश रमण्णा यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून दाखल केलेली याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याची गरज आहे का असा विचार करत असल्याचं सूचक वक्तव्य केले आहे.त्यामुळे यासंदर्भात ते काय निर्णय हे पहावे लागणार आहे
बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतच्या याचिकेवरील सुनावणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. आधी ८ ऑगस्ट, नंतर १२ ऑगस्ट अशी तारीख निश्चित करण्यात आली होती पण ती सुनावणी १० दिवस लांबणीवर पडली असून २२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.