१० हजारांच्या बजेटमध्ये Oppoचे भन्नाट स्मार्टफोन्स, पहायला हवेत

अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा मग Oppo चे ‘हे’ एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन्स पहायला हवेत. Oppo कंपनीकडे १० हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या हँडसेट्सची मोठी लिस्ट आहे. ओप्पोच्या या फोन्समध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटरी, शानदार कॅमेरा, डिस्प्लेसह अनेक फीचर्स मिळतील. १० हजारांच्या बजेटमधील ओप्पोच्या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Oppo A15S

या स्मार्टफोनला तुम्ही ११,०९० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ६.२ इंच एचडी प्लस डिस्प्ले, ४२३० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी३५ ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. फोनवर ९,९९० रुपयांपर्यंत ऑफरचा फायदा मिळेल.

OPPO A16e

OPPO A16e स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,४९० रुपये आहे. फोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस स्क्रीन, एआय स्मार्ट बॅकलाइट डिस्प्ले दिला आहे. हा ३डी डिझाइनसह येतो. याचे वजन १७५ ग्रॅम असून, जाडी ७.८५ एमएम आहे.

OPPO A12

OPPO A12 स्मार्टफोनसाठी तुम्हाला ९,९९० रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. तसेच, ६.२२ इंच एचडी रिझॉल्यूसन डिस्प्ले, ४२३० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेर मिळतो. रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

OPPO A16k

OPPO च्या या फोनला फ्लिपकार्टवरून ९,४९० रुपयात खरेदी करता येईल. फोनमध्ये ३ जीबी रॅम + ३२ जीबी इंटर्न स्टोरेज, ६.५२ इंट डिस्प्ले, मीडियाटेक जी३५ प्रोसेसर, फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

प्रमुख ई-कॉमर्स साइट Flipkart आणि Amazon सह इतर ऑनलाइन, ऑफलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.