रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली ! सावधान !!

भारतीय सैनिकांना हनी ट्रॅपध्ये अडकवण्यासाठी पाकिस्तानची महिला ब्रिगेड तयार करून त्यांच्याद्वारे कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न केला जातोय.पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या संघटनेत 50 मुलींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय गुप्तचर संघटनेकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानकडून हा कुटील डाव रचला जात असल्याने भारतीय गुप्तचर संस्थेकडून लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून हा धोका असल्याने सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अशी सुचनाही भारतीय गुप्तचर विभागाकडून देण्यात आलेली आहे.

पाकिस्तानी महिला एजंटांना हैदराबाद, सिंध येथून पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिट 412 द्वारे प्रशिक्षण दिले जाते.या मॉड्यूलचे लक्ष्य राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लष्करी तळांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांवर आहे. महिला ब्रिगेडला नियुक्त केल्यानंतर पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ट्रेनिंग दिले जात असून ट्रेनिंगनंतर हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर या मुलींना मेक-अप किट दिले जातात. यासोबतच त्यांना रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू, अवनी, मुस्कान आणि हरलीन अशी भारतीय नावंही देण्यात येत आहेत.या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट करुन त्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. सैनिकांना आपल्या जाळ्यात ओढून नंतर या सैनिकांना ब्लॅकमेल केले जाते. म्हणजेच जे मागितले ते देण्यास नकार दिल्यास चॅट आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी सुरू होते. त्यामुळे भारतीय गुप्तचर विभागाकडून सैन्य दलातील अधिकाऱ्यांना आणि जवानांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.