आर्यन खानच्या प्रेमात ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रचंड चर्चेत असतो.मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरण असो वा त्याने केलेले फोटो शूट, सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असतेच. सध्या आर्यन खान चर्चेत आलाय कारण एका अभिनेत्रीने त्याच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. आता तुम्ही म्हणाल तो स्टार पूत्र आहे त्यामुळे अभिनेत्री त्याच्याबद्दल बोलणारच. यातच मोठी बातमी आहे ती म्हणजे एका पाकिस्तानी अभिनेत्रीने आर्यन खानबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
त्या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव सजल अली असून तिने इन्स्टा स्टोरीवर आर्यन खानचा फोटो पोस्ट केलाय. यासोबतच तिने शाहरुख खानच्या चित्रपटातील ‘हवाये’ गाण्याची पार्श्वभूमी मांडली आहे. यासोबत सजलने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केलेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.तिने फवाद खानच्या ‘बेहद’ मध्ये सजल अलीने एका त्रासलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. जी आपल्या आईच्या प्रियकराच्या प्रेमात पडते. या चित्रपटातील तिच्या कामाचे समीक्षकांनी देखील प्रचंड कौतुक केले होते.
सजलचा जन्म लाहोरमध्ये झाला असून पाकिस्तानी टीव्ही विश्वातून तिने अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. मॉम या बॉलिवूड चित्रपटात तिने श्रीदेवीच्या मुलीची भूमिका केली होती. तिचा ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ या चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता.