बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या,शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?

काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावरुन अक्षरशः झोंबणारी टीका केली. काल एका कार्यक्रमात मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव अशी प्रार्थना गणपतीकडे

केल्याचं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं होतं. त्याला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर मिळालंय. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके…. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा शिवसेनेकडून देण्यात आलाय. 

पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना हे प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडियात इंगोले यांच्या पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यावर तुफान चर्चा होतेय. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे शिंदे गटात गेल्यावर एका डयलॉगमुळे फेमस झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदार असून निधी कमी पडतोय, खूप गरीबीत राहतोय, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यातच किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पंढरपूरच्या युवासेना नेत्यानं त्यांना आधी ती साडी घेऊन या असा सल्ला दिलाय.बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला 50 खोक्यातून साडी घेऊन द्या अशी बोचरी टीका करणारी पोस्ट व्हायरल होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.