यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान एकनाथ शिंदेंना

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. या घोषणेबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरील यंदा आषाढीची पूजा कोण करणार हा संभ्रम देखील दूर केला आहे .

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की फडणवीस जाणार या चर्चांना उधाण आला होता.फडणवीसांच्या घोषणेनंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.