IT ची रेड संपताच पाटलांना दरेकर का भेटले?आता भाजपात प्रवेश करणार ?

काही दिवसांपासून पंढरपूरमधील एक नव्या दमाच्या आणि उभरत्या साखर सम्राटाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. तो साखरसम्राट आहे पंढरपूरचा, तुम्ही बरोबर ओळखलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत. डिव्हीपी ग्रूपचे चेअरमन असणारे अभिजीत पाटील यांनी दोन महिन्यापूर्वी झालेल्या विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक पाटलांनी आपल्याकडे खेचली होती. पण काहि दिवसांपासून पाटील चर्चेत आले आहेत कारण त्यांचे घर आणि कारखान्यावर पडलेल्या आयटीच्या धाडीमुळे. अभिजीत पाटलांच्या घरी तीन दिवस आयटीची धाड पडली, चौकशीवर चौकशी झाली. मात्र आयटी अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही अशी माहिती अभिजीत पाटलांनी मीडियासमोर दिली..
आता हे सगळं झाल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी अभिजीत पाटलांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा अभिजीत पाटील चर्चेत आले. प्रवीण दरेकरांनी अभिजीत पाटलांच्या कार्यालयाला भेट दिली त्यात दोघांमध्ये चर्चा झाल्या. आता या भेटीमुळे अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु झाल्या. यासंदर्भात प्रवीण दरेकांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता दरेकर म्हणाले, अभिजीत पाटील माझे चांगले मित्र आणि तरूण उद्योजक आहेत. पाटील यांना साखर कारखाना चालवण्याचा अनुभव असून त्यांना मुंबई बॅंकेने देखील मदत केली आहे.लवकरच ते सर्व चौकशीतून बाहेर येतील अशी क्लिनचीट देत अभिजीत पाटील लवकरच भाजपमध्ये येतील असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आज पंढरपुरात व्यक्त केला.आता अभिजीत पाटील भाजपात जाणार का हे उत्तर येणार काळच देईल पण अभिजीत पाटलांच्या घरी आयटीची धाड त्यानंतर दरेकरांनी घेतलेली त्यांची भेट या गोष्टी खूप काही सांगतात असंच म्हणायला हवं