![YA 4 AHET MAHILA MUKHYAMANTRI 28-DEC-24](https://batmya.in/wp-content/uploads/2024/12/YA-4-AHET-MAHILA-MUKHYAMANTRI-28-DEC-24-1024x536.jpg)
2022 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर महायुती सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यावर अदिती तटकरे यांच्या रूपाने एका महिला आमदाराला मंत्री पद देण्यात आलं होतं. पण तरी देखील मंत्रिमंडळात महिलांना फक्त नावापुरताच स्थान मिळालं होत. या मुद्द्यावरून महायुती सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. याच टीकेचा विचार करून आता महायुती सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी दिल्याच पाहायला मिळालं. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नेमक्या कोणत्या महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तेच जाणून घेऊयात
![](https://maharashtrakatta.in/wp-content/uploads/2024/12/आदिती-तटकरे-.jpg)
महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांच्या यादीतील सगळ्यात पहिलं नाव आहे श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांचं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होत्या. आणि आता नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये देखील आदिती तटकरेंनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मागील मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास खात देण्यात आलं होतं, त्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळात कोणतं खात दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
![](https://maharashtrakatta.in/wp-content/uploads/2024/12/पंकजा-मुंडे-1.jpg)
यासोबतच महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंकजा मुंडे यांचा ओबीसी प्रवर्गावर असलेला प्रभाव, एक धुरंधर महिला राजकारणी म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख ,गोपीनाथ मुडेंचा त्यांना लाभलेला वारसा आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळावा यासाठी त्यांनी केलेला प्रचार या सगळ्या मुळे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे.
![](https://maharashtrakatta.in/wp-content/uploads/2024/12/मेघना-बोर्डीकर.jpg)
मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या तिसऱ्या महिला आहेत भाजपाच्या मेघना बोर्डीकर. भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे या परभणीच्या आमदार आहेत. दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झालेल्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद देण्यात आल आहे. तर मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपद मिळाल्याने तब्बल 10 वर्षांनंतर परभणी जिल्ह्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले आहे.
![](https://maharashtrakatta.in/wp-content/uploads/2024/12/माधुरी-मिसाळ.webp)
पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या चार टर्म आमदार माधुरी मिसाळ यंदा मंत्रीपदासाठी इच्छुक होत्या. व त्यांच्या याच इच्छेचा मान ठेवत भाजपा कडून त्यांना मंत्रिपद देण्यात आला. शपथविधीच्या सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माधुरी मिसाळ यांना फोन करून या संबंधी माहिती दिली होती. तर पक्ष देईल ती जबाबदारी व देईल ते पद मी स्वीकारेल अशी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी दिली होती.
काल जवळपास 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र यातील फक्त चारच महिला मंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात महिलांचा समावेश जरी करण्यात आला असला तरीसुद्धा तो प्रभावी नाहीये. जिथे महिलांना बरोबरीच अर्थात 50 टक्क्यां एवढ स्थान देणं अपेक्षित असतं, तिथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फक्त १० टक्के महिला आ