माणसांप्रमाणे आता म्हशींचं आधारकार्ड बनणार!!

आधार कार्ड म्हणजे तुमच्याजवळचं महत्त्वाचं ओळखपत्र आहे. यामुळे बरीच कामे सोपी झालीत तसेच फसवणूक थांबलेली आहे.मोदी सरकारचं हे मोठं यश असून आता तर सरकार प्राण्यांचं आधारकार्ड बनविणार आहे.
तुम्ही म्हणाल काय गंमत करताय प्राण्यांचे आधारकार्ड ते आता कसं शक्य आहे. सगळं काही शक्य आहे कारण ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे.आगामी काळात माणसांप्रमाणं चक्क म्हशींचे देखील आधार कार्ड काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली असून याबाबतची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
‘पशु आधार’ असं या मोहिमेचं नाव आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळं मदत होईल, असं मोदींचं म्हणणं आहे.आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जातोय.आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. तशीच माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्राण्यांची घेतली जाणार आहे.