‘या’ राजाने केली देशातील शेवटच्या चित्त्याची हत्या

#cheetahisback हा सध्या सोशल मीडियावर टॉप ट्रेन्ड आहे. ७० वर्षांनंतर नामशेष झालेल्या चित्त्याची भारतात घरवापसी झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीचं चित्ता भारतात आलेला आहे. नामिबियातील ८ चित्ते एका खासगी कार्गोतून भारतात आणण्यात आले. आता भारतियांना चित्ते पहायला मिळणार आहेत , खरंतर भारतात चित्ते होते मग ते नामशेष का झाले? शेवटच्या चित्त्याची शिकार कोणी केली?
एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतामध्ये चित्ते होते. राज घराण्यात चित्ते पाळण्याची पद्धत होती.पण अतिशिकारीमुळे भारतातून चित्त्याची प्रजाती नष्ट झाली. अगदी मुघल काळापासून राजे महाराजे चित्ते पाळत होते. मुघल शासक अकबरने १००० चित्यांचे संरक्षण केले होते ही माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्येही आपल्याला सापडेल.
१९५२मध्ये चित्त्याला नामशेष म्हणून घोषित करण्यात आले तर १९४८मध्ये छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील सालच्या जंगलात शेवटचा चित्ता मृत अवस्थेत आढळला होता. कोरियाचे राजा महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली. त्यानंतर चित्ता भारतातून नामशेष झाला.
अखेर तब्बल ७० वर्षांनंतर चित्ते भारतात परत आले आहेत.मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात नेण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना उद्यानात सोडण्यात आलंय.