मोदींकडून सूरतमध्ये तब्बल ३४०० कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन, म्हणाले “सूरत म्हणजे मिनी-भारत, येथे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी सूरत येथे ३४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते भूमीपूजनही करण्यात आलेले आहे. यंदा ३६ व्या राष्ट्रीय क्रीड स्पर्धा गुजरातमध्ये होत आहेत त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा गुजरातमध्ये होत असून पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची तुफान गर्दी झाली होती.

गुजरातमध्ये घर बांधणीच्या कामाला वेग आला असून सूरतमधील मध्यमवर्गीय, गरीब लोकांनाही सुविधा मिळतायेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील चार कोटी रुग्णांना मोफत उपचार मिळालेले आहेत. यामधील ३२ लाख गुजरात आणि १ लाख २५ हजार सूरतमधील आहेत असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी असेही म्हणाले, नवरात्रीच्या काळात पायाभूत सुविधांचे भुमीपूजन, क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करणे हे मी माझे भाग्य समजतो. सूरत हे एकतेचं उत्तम उदाहरण आहे. देशभरातील लोक सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. हा मिनी-भारत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी अहमदाबाद, सूरत, गांधीनगर,अंबाजी आणि भावनगर येथे भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचं भुमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असून त्याआधी नरेंद्र मोदींचा हा नियोजित दौरा पार पडतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.