मोदींवरही ‘उद्धव ठाकरे फीवर’ ! चित्ते भारतात येताच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ८ चित्ते नामिबियातून आज भारतात आणण्यात आले. मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात त्यांना ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत त्या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही ‘उद्धव ठाकरे फीवर’ दिसून आला.
हे वाचून तुम्ही गडबडून गेला असाल ना म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे असा विचार तुमच्या मनात आला असेल. याचा उद्देश एवढाच होता की त्या चित्त्यांचा फोटो स्वतः नरेंद्र मोदी यांनी काढला. एक भलामोठा कॅमेरा मोदींनी हातात घेतला आणि त्या चित्त्यांचे फोटो काढताना ते दिसले. उद्धव ठाकरेंची फोटोग्राफीची आवड तर सर्वश्रुतच आहे. आता मोदीही चित्त्यांचे फोटो काढताना दिसले. त्यामुळे त्यांच्यावर उद्धव ठाकरे फीवर दिसून आला. यापूर्वीही त्यांनी स्वतः कॅमेऱ्यातून विविध फोटो काढलेले आहेत. नेत्यांसोबत सेल्फी काढतानाही पंतप्रधान मोदी दिसत असतात. नामिबियामधून आलेल्या ८ चित्त्यांमध्ये ५ नर आणि ३ मादी चित्ते यांचा समावेश आहे. जवळपास ७० वर्षांपासून भारतात चित्यांचा वावर नाही. त्यामुळे नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत.