PM Modi: चित्त्यांचे कौतुक सोडा; त्यांचे फोटो काढणाऱ्या मोदींच्या कॅमेऱ्याची किंमत ऐकलीत का?

काल देशभरात एकाच गोष्टीची चर्चा होती ती म्हणजे नामिबियातून भारतात आलेले ८ चित्ते. या चित्त्यांना मध्यप्रदेशातल्या कुनो अभयारण्यात सोडण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास उपस्थित होते. या चित्त्यांना अभयारण्यात सोडताना पंतप्रधान मोदी यांनी खास फोटोग्राफी केली त्याच्यासुद्धा सगळीकडे चर्चा रंगलेल्या होत्या. 

दरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्या व्यावसायिक कॅमेऱ्याने चित्त्यांचे फोटो काढले तो कॅमेरासुद्धा खास आहे. साधारण डीएसएलआर कॅमेऱ्याची लेन्स खूपच लहान असते. पण मोदींच्या हातात असणाऱ्या कॅमेराची लेन्स पाहा ती मोठी आणि जड आहे. अशा प्रकारची लेन्स लांब अंतरावरचे शॉट्स घेण्यासाठी वापरली जाते. वन्यजीव छायाचित्रकार सामान्यतः अशी लेन्स वापरतात, जेणेकरून त्यांना फोटोसाठी प्राण्यांच्या जास्त जवळ जावं लागत नाही.

सध्या डीएसएलआर कॅमेऱ्याच्या किमती ५० हजार ते एक लाखांच्या घरात आहेत. मात्र त्यासाठी ज्या लेन्स वापरल्या जातात त्यांची किंमत सर्वात जास्त असते. साधारण या लेन्सची किंमत एक ते पाच लाखांच्या आसपास आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक ब्रँडनुसार लेन्सच्या किमती बदलतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.