नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच भव्य अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभाच्या भव्यतेचा अंदाज त्याची उंची आणि वजनावरुन लावता येईल.
अशोकस्तंभाचे वजन 9500 किलो आहे जी पूर्णत: तांब्याने तयार करण्यात आलं आहे. याच्या सपोर्टसाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलचा ढाचा देखील तयार करण्यात आला आहे.अशोक स्तंभ संसद भवनाच्या छतावर पोहोचण्याआधीही त्यावर अनेक पद्धतीने टप्प्याटप्प्याने काम झालं. अशोक स्तंभ येथे स्थापित करण्यापूर्वी आठ टप्प्यांतून गेला होता, ज्यामध्ये त्याचे स्केचिंग, फॅब्रिकेशन आणि पॉलिशिंग यांचा समावेश आहे.नवीन संसद भवनाचे बांधकाम डिसेंबरपूर्वी होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना तेथील कामगारांशीही संवाद साधला.