१ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”

‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारी महाराष्ट्रात येणारा कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापले आहे. शिंदे सरकारला याबद्दल जबाबदार धरेले जात असून शिंदे सरकारने सगळे खापर मविआ सरकारच्या डोक्यावर फोडलेले आहे. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या करारासंदर्भात ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली असून हा करार भारतामध्ये सेमीकंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळणार असून याचा फायदा मध्यम आणि लघू उद्योगांना होईल अशा आशयाचं ट्विट केलंय. मविआ सरकारच्या काळात वेदांत समूहाने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. 

हा उद्योग महाराष्ट्रात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्यही घेण्यात येणार आहे असे शिंदे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आणि वादाची ठिणगी पडली. 

फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण, गुजरातच्या महाशक्तीपुढे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. याआधी फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची अ‍ॅपल कंपनीशी निगडीत गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी त्यांना यश आले नव्हते.आता या प्रकारात फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.