शिवसेनेची तोफ विधानसभेत दिसणार नाहीत? नमस्कार करून निघाले…काय घडले? Video

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणारा आमदार म्हणजे भास्कर जाधव ! कोकण असो किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना आपल्या शाब्दिक हल्लाने अंगावर घेतलं. विधीमंडळातही त्यांचा आक्रमकपणा अनेकांनी पाहिलेला आहे. मात्र तेच भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय.
उद्या गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने आणि पुढील काळात सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याने मी निघून जात आहे, असं भास्कर जाधव म्हणालेत. भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांचं यावेळी दर्शन घेतलं. अधिवेशन काळात बोलू न दिल्याने आणि कोणतीही लक्षवेधी न लावल्याने जाधव यांनी नाराजी देखील व्यक्ती केली.
भास्कर जाधव विधिमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार करुन निघाले; नेमकं काय घडलं? pic.twitter.com/bpabNusOvj
— devendra jadhav (@devendr50306300) March 21, 2023
मी विधीमंडळात येणार नाही कारण माझी इच्छा राहिली नाही. मनात अत्यंत वेदना आहे. मी एकही दिवस अधिवेशनाचा चूकवत नाही. मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. मी नियमानं बोलण्याच प्रयत्न करतोय. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही.त्यामुळे मनात अत्यंत वेदना आहेत, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. विधिमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार केलेला त्यांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.