आंबेडकरांचा वकिली युक्तीवाद ! ‘सुप्रीम निर्णयाने चुकीचा पायंडा’

खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याचा निर्णय आहेत निवडणूक आयोग घेणार आहे. देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. याप्रकरणी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आता ज्येष्ठ वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांनाच बंधनकारक आहे पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का याबाबत मला शंका आहे असे आंबडेकर म्हणाले आहेत. त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे निवडणूक आयोगाने स्वत:च्याच अधिकाराचा वापर करत पक्षचिन्हाबाबत १९६८ सालचा कायदा तयार केला होता. या कायद्यातील कलम १५ वादग्रस्त आहे. त्यानुसार एखाद्या पक्षात चिन्हाबाबत वाद झाला तर निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार प्राप्त झाले होते.सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदाच ही संधी चालून आली होती की, कलम १५ हे संवैधानिक आहे किंवा नाही, याची तपासणी करता आली असती. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ती तपासणी केली नाही.
परिणामी आतापर्यंत सुप्रीम कोर्ट आणि संसदेने राखून ठेवलेला निवडणूक आयोगाची तटस्थता या निर्णयामुळे नष्ट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षचिन्हाचा निर्णय हा निवडणूक आयोगच घेईल, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे सु्प्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनवरालोकन करणे गरजेचे आहे असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते आहे.