प्रवीण तरडेची पोस्ट चर्चेत..कारण

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी तयार केलेल्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ असो ‘धर्मवीर’ किंवा ‘हंबीरराव’ प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. तरडेंच्या पोस्टची नेहमीच चर्चा होत असते आज त्यांनी स्वतःचा फोटो पोस्ट करत एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न आहे की आगामी चित्रपट अशी चर्चा आता या पोस्ट नंतर सुरू झालीय.

प्रवीण तरडे यांनी आपला एक जुना फोटो शेअर करत त्यालाए एक कॅप्शन दिले आहे. ते म्हणतात, ‘अण्णाभाऊंचा फकिरा असाच दिसत असेल?’ त्यांचा हा प्रश्न प्रचंड सूचक आहे. त्यामुळे अनेकांनी यावर कमेंट करून होकार दर्शवला आहे ते अनेकांनी थेट चित्रपट येणार असा अंदाज वर्तवलाय.

‘फकिरा’ ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत ‘फकिरा’ नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा ‘फकिरा’ आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी उत्तम अशी ही कादंबरी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.