महाराष्ट्राच्या राजकारणावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी जोरदार निशाणा साधलाय. यशवंत सिन्हा शुक्रवारी रायपूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं वर्णन ‘सत्तेची धोकादायक भूक’ असं केलंय. एवढंच नाही तर सिन्हांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्लाबोल केलाय. सिन्हा म्हणाले, ‘आज देशभर अशांततेचं वातावरण निर्माण झालंय. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वतः त्याचा प्रचार करत आहे.’

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार सिन्हांनी रायपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते पुढं म्हणाले, महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळं आपल्या लोकशाहीचं महत्त्व वाढलं आहे का? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारवर टीका करताना सिन्हा म्हणाले, केंद्र सरकार एकात्मतेच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, तर संघर्षाचं राजकारण करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.