द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित?

आज देशाला १५ व्या राष्ट्रपती मिळणार आहेत. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आजा २१ जुलैरोजी सकाळी ११ वाजल्यापासून  संसद भवनात मतमोजणी सुरु होणार आहे. दरम्यान NDAच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. जर द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. २५ जुलै २००७ रोजी प्रतिभा पाटील यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं होतं.  आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जातोय. 

आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल

१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये मतगणना होणार आहे.मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी ८ जुलै रोजी निवडणुक झाली यात ४८००  खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना २७ पक्षांचा पाठिंबा तर यशवंत सिन्हा यांना १४ पक्षांचा  पाठिंबा होता. सकाळी ११ वाजता संसद भवनाच्या रूम नंबर ६३ मध्ये मतमोजणी सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंच निकाल येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.