राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारलेली आहे.
आहे. द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळालेली आहेत.द्रौपदी मुर्मू 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.देशाची सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होतो आहे. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत.
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत ५४० मतं मिळाली या मतांचे मुल्य ३,७८,००० इतकं होतं. तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाले त्याचे मुल्य १४५६०० इतकं आहे. दुसऱ्या फेरीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना १३४९ मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळालेली आहेत.
१५ वर्षांपूर्वी म्हणजे २१ जुलै २००७ रोजी प्रतिभा पाटील यांच्या रुपात देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. त्या देशाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. २००७ ते २०१२ असा त्यांचा कार्यकाळ होता.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या आदिवासी नेत्या आहेत. ओडिशात BJP-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ मध्ये मंत्री होत्या.झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेले आहे. रायरंगपुर मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये एका आदिवासी कुटुंबात झाला होता. त्या शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या त्यांनतर द्रौपदी मुर्मू यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९७ मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून त्या विजयी झाल्या होत्या.२००० ते २००९ ओडिशा विधानसभेवर आमदार, २००० ते २००४ मध्ये कॅबिनेट मंत्री तर २०१५ झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
देशात आत्तापर्यंत आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती. आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा ही मागणी केली जात होते अखेर द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ते साध्य झालेले आहे.