स्वयंपाकाचा गॅस, नवे दर माहित आहेत का?

भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिलाय. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.

एक जुलै रोजी दिल्लीमध्ये १९ किलोच्या म्हणजेच व्यवसायिक वापरातील सिलेंडरच्या किंमती १९८ रुपयांनी कमी करण्यात आलेल्या. तर एक जून रोजी व्यवसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या किंमती १३५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

कुठे किती किंमत?

दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २०२१ रुपये होती. आज त्यात ८ रुपये ५० पैशांनी वाढ झाली असून ही किंमत आता २०३० रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर कोलकात्यामध्ये सिलेंडरच्या दर आता २१४९ वर पोहचले आहेत. मुंबईत १९९० रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २१९५ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा ७ मे रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर १९ मे रोजीही घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

घरगुती सिलेंडरचे दर कसे?

मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.