पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का बदलले DP?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर डीपी बदलेले आहेत. डीपीच्या जागी तिरंग्याचा फोटो लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मन की बात या कार्यक्रमात म्हणाले होते की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जन आंदोलनात बदलत आहे. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात देशवसियांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाईल फोटो आणि डीपी हे तिरंग्याचे असावेत, असे आवाहन मोदी यांनी केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ट्विट केले होते त्यात, दोन ऑगस्ट हा आजचा दिवस खास आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी आपण सामूहिक मोहिमेंतर्गत घऱ घर तिरंगा यासाठी आपण तयार आहोत. मी माझ्या सोशल मीडियावरील पेजचा डीपी बदलला आहे. आपणसुद्धा हे करावे असा आग्रह मी तुम्हाला करीत आहे. त्यानुसार पंतप्रधान आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी डीपी बदलेले आहेत. तसेच इतरांनाही तिरंगा डीपी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तिरंग्यासाठी 2 ऑगस्ट हा दिवस फारच महत्त्वाचा असून या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कारण त्या दिवशी राष्ट्रध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच तिरंग्याचे छायाचित्र सोशल मीडियावर ठेवून पिंगली व्यंकय्या यांच्याबद्दल आदर करावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅडम कामा (भिकाजी रुस्तम कामा) यांच्याबद्दलही चर्चा केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही डीपी बदलला अ्सून डीपीवर तिरंगा लावला आहे. राष्ट्रध्वजाप्रती आपले प्रेम आणि सन्मान दाखवण्यासाठी मी सगळ्यांना सोशल मीडिया अकाऊंटच्या डीपीवर तिरंगा लावण्याचे आवाहन करतो. असा संदेशही लिहाला आहे.