देशातील प्रमुख शहरे किती सुरक्षित? NCRB अहवाल सांगतो….

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवाल समोर आला असून देशातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे शहर ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर कोलकाता हे सर्वात सुरक्षित शहर असून ते प्रथम क्रमांकावर आहे.
कायदा-सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित ठरले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात पुणे शहर ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत कमी गुन्हे घडत असल्यामुळे एनसीआरबीसीच्या यादीत कोलकाता हे सुरक्षित शहरांच्या यादीत पहिल्या, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे.
निवृत्तीनंतर अनेक जण पुण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. वाहतूक, दळणवळण या सुविधांमध्ये पुणे उणे असले, तरी कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील सुरक्षित शहर मानले गेले आहे. या अहवालातील धक्कादायक गोष्ट म्हणजे देशाची राजधानी दिल्लीचा पहिल्या पाच सुरक्षित शहरांमध्ये समावेश नाहीए. दिल्ली सर्वात जास्त असुरक्षित असून ३२.२० टक्के महिलांवरील गुन्हे फक्त दिल्लीत घडलेले आहेत.