‘श्रीवल्ली’चं मराठी वर्जन करणाऱ्या विजय खंडारेचं नवं गाणं पाहिलं का?

पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाणं आपल्याला नक्कीच आठवत असेल. या फेमस गाण्याचे एक मराठी वर्जन आले आणि त्यालासुद्धा लोकांनी पसंतीची पावती दिली. श्रीवल्लीचं मराठी वर्जन करणारे अमरावतीचे विजय खंडारे या गाण्यामुळे चर्चेत आले होते. आज पुन्हा त्यांचा विषय निघायचे कारण म्हणजे विजय खंडारे यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे.अमरावती प्रस्तुत विदर्भातील कलाकारांची कलाकृती “शेवटचं पान” हे गीत ७ तारखेला तापडिया सिटी सेंटर येथे प्रदर्शित करण्यात आले You tube वर या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. या गाण्याच्या मुख्य भुमिकेत श्रीवल्ली मराठी वर्जन करणारे विजय खंडारे झळकरणार आहेत. तर सृष्टी गाडगे त्यांच्या साथीला आहेत.विजय खंडारे यांच्या यूट्यूब चॅनल वर हे गाणं आपण पाहू शकता.
या गीताचे दिग्दर्शन रोहित काळे तसेच मयूर बर्डे यांचे असून संगीत संयोजन श्रीनिवास मोहोड यांनी केले आहे. या गाण्याला विनय वानखडे यांचा आवाज असून निखिल लिघाटे आणि विनय वानखडे यांच्या लेखणीतून हे गाणं साकार झालंय. मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावी तसेच मध्य प्रदेशातील नळा मानी या गावी या गाण्याचे शुटीगं करण्यात आले आहे.