ब्रिटनच्या महाराणींचं निधन; भारताच्या कोहिनूर हिऱ्याचं काय होणार?

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात अनेक बातम्या देण्यात आल्या आहेत. जगभरातून शोक व्यक्त करण्यात येतोय. या सगळ्यांमध्ये खास करुन भारतीयांना हा प्रश्न पडलाय की महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कोहिनूर हिऱ्याचे काय होणार? ब्रिटनच्या महाराणी विशेष कार्यक्रमात मुकूट परिधान करतात. याच मुकूटात भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा आहे. याशिवाय मुकूटामध्ये २ हजार ८६७ हिरे आहेत. ट्विटरवरसुद्धा हा प्रश्न ट्रेंडमध्ये आहे. 

डचेस ऑफ कॉर्नवाल कॅमिला ब्रिटनच्या नव्या महाराणी असतील. त्या एलिझाबेथ द्वितीय यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी आहेत. महाराणी यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स राजा होतील. एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे असलेल्या मुकूटाची निर्मिती १९३७ मध्ये झाली होती. सहाव्या जॉर्ज यांच्या राज्याभिषेकासाठी या मुकूटाची निर्मिती करण्यात आली होती. या मुकूटामध्ये अनेक मौल्यवान रत्नं आहेत. 

कोहिनूर १०५ कॅरेटचा हिरा आहे. ब्रिटनच्या महाराणींच्या मुकूटामध्ये क्रॉसजवळ कोहिनूर हिरा आहे. राजपुत्र चार्ल्स राजे झाल्यानंतर डचेस कॅमिला महाराणी होतील, अशी घोषणा एलिझाबेथ यांनी याच वर्षी केली होती. त्यामुळे राजपुत्र चार्ल्स यांच्या राज्याभिषेकादरम्यान कॅमिला यांनाच कोहिनूर हिरा जडवण्यात आलेला मुकूट सोपवण्यात येईल.

८०० वर्षांपूर्वी भारतात एक चमकता दगड सापडला. त्याला कोहिनूर नाव देण्यात आलं होतं. प्रकाशाचा पर्वत असा कोहिनूरचा अर्थ आहे.पंजाबचे शेवटचे शीख शासक असलेल्या दलिप सिंह यांनी १८४९ मध्ये महाराणींना कोहिनूर हिरा भेट दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.