राहुल गांधींना पोलिसांच्या नोटीसीनंतर काँग्रेसच ट्वीट चर्चेत

आज दिल्लीमध्ये राजकीय वातावरण सकाळपासून तापलं होतं कारण दिल्ली पोलीस थेट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले होते. राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितांवर दिलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांच्या नोटिशीला 10 मुद्यांमध्ये 4 पानांचे उत्तर दिले आहे. अदानीवरील माझ्या वक्तव्यामुळे असे होत आहे का, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारलाय. मी ४५ दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते, त्यावर अचानक नोटीस देण्याची काय गरज? असेही राहुल गांधी म्हणालेत.

या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी 8 ते 10 दिवसांचा अवधी मागितला आहे. त्याचवेळी काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, ‘सावरकर समजलात का… नाव राहुल गांधी आहे’.

या प्रकरणी राहुल गांधींनी स्पेशल सीपी सागर प्रीत हुडा यांची भेट घेतली. विशेष सीपींनी सांगितले होते की, आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत माहिती मागवली आहे. राहुल गांधींनी थोडा वेळ मागितला असून माहिती देऊ असे सांगितले आहे. 

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी बलात्कार पीडितेवर वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये म्हणाले होते, अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या. त्या रडत होत्या आणि भावूक झाल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींनी बलात्कार, विनयभंग झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना कळवायचे का, असे मी त्यांना विचारले. तर त्या म्हणाल्या की राहुल जी आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचे होते. यावेळी पोलिसांना सांगू नका, अन्यथा आमचे आणखी नुकसान होईल.

पोलिसांचे एक पथक 15 मार्च रोजी राहुल गांधींना या वक्तव्यासंदर्भात नोटीस देण्यासाठी गेले होते. टीम तिथे 3 तास थांबली, पण राहुल गांधी भेटले नाहीत. 16 मार्च रोजी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्यांच्या घरी गेले. दीड तास वाट पाहिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना नोटीस मिळाली. नोटीसला योग्य वेळी कायद्यानुसार उत्तर देऊ, असे काँग्रेस पक्षाने म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.