रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलत्या तिन्ही मार्गावर शनिवारी 23 जुलै रात्री आणि रविवारी 24 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे टाईमटेबल तापसूनच बाहेर पडायला हवे. कारण मेगाब्लॉकमुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे
मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. तसेच लोकल 10 मिनिटे विलंबाने धावणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर भायखळा – माटुंगा जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) दिनांक 23 जुलै 2022 रोजी रात्री 11.30 पासून दिनांक 24 जुलै 2022 च्या पहाटे 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यानंतर रविवार 24 जुलैला मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत सुद्धा या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
या गाड्यांचे मार्ग बदलले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 24 जुलै 2022 रोजी सकाळी 5.20 वाजता सुटणारी जलद मार्गावरील ट्रेन्स भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
ठाणे येथून 23 जुलै रोजी रात्री 10.58 आणि रात्री 11.15 वाजता सुटणाऱ्या जलद मार्गावरील ट्रेन्स माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर पनवेल – वाशी स्थानकात सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.