ठाकरेंची गर्जना, रात्रीत निघाले आदेश अन् सकाळ-सकाळी माहिमचं बांधकाम हटवलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकामाला सुरुवातही झाली. आता हे काम पूर्ण झालंय.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली. माहिम इथं दर्ग्याची मजार आहे. ही मजार ६०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा इथल्या ट्रस्टने केला आहे. ही मजार न हटवता फक्त तिच्या आजूबाजूचं बांधकाम हटवण्यात आली आणि  बांधकाम पूर्ण झालंय.

काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये त्यांनी माहिम परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याचं दाखवलं होतं. त्या दर्ग्यावर जर एका महिन्याच्या आत कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला आपण गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी काल दिला होता. त्यानंतर लगेचच माहिम परिसरातली सुरक्षा पोलिसांनी वाढवली. त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेशही काढण्यात आले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.