राज्यपालांचे वक्तव्य…काय म्हणाले राज ठाकरे?

ज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका भाषणात मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं असून चोहोबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. उगीच निवडणुकिच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही काय बोलताय हे कळण्या इतके आम्ही दुधखुळे नाही अशा आशयाचं खरमरीत पत्र त्यांनी राज्यपालांना लिहीलं आहे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईमधील अंधेरी येथे असलेल्या कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेलं.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यपालांना इशाार दिला आहे. इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलू नका असेही राज ठाकरे यांनी राज्यपालांना सांगितले आहे.