महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युत्या झाल्या, अनेक आघाड्या झाल्या मात्र या सगळ्यांच्या उपर महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात एक वेगळीच युती व्हावी अशी इच्छा आहे. आणि हीच अनेक मराठी माणसांच्या मनातील युती म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची. सध्या विधासभेमध्ये केलेल्या खराब प्रदर्शनानंतर एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा चालू आहेत तर दुसरीकडे मनसेच्या अस्तित्वावर देखील संकट आलं आहे त्याच पार्शवभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.
अनेकदा राज ठाकरे यांचा एकला चलो रे चे नारा पाहायला मिळतो तर उद्धव ठाकरे नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी युती सोबत किंवा आघाडी सोबत गुंतलेले असतात त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे तसे फारसे कमीच चान्सेस तयार होतात. अशातच सध्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी अपेक्षा अनेकांना वाटत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येकालाच प्रत्येक युती किंवा आघाडी आवडतेच असं नाही मात्र राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी जर युती केली तर ती महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडेलच असं म्हटलं जातं तर दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर… या विचारानेच अनेक राजकारण्यांना घाम फुटतो. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे ते दोघे जर एकत्र आले तर आम्ही त्यांनाच मत करू असं मत देखील अनेक जण व्यक्त करतात. आणि त्यामुळेच राज ठाकरे , उद्धव ठाकरे यांच एकत्र येण अनेक राजकीय नेत्यांचं अस्तित्व धोक्यात आणणार असेल तर दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर संपूर्ण मराठी माणसांची मते एकवटतील परिणामी राज-उद्धव यांच्या जोडीला राजकारणात यश मिळेलच यात काही शंका नाही.
आता या सर्व जर- तर च्या गोष्टी असल्या तरीसुद्धा राज ठाकरेंचा एकला चलो रे चा नारा, युती आखाड्यांमध्ये गुंतलेले उद्धव ठाकरे, दोघांमधील अंतर्गत वाद यांसारख्या अनेक कारणांमुळे राज व उद्धव ठाकरे यांची युती अद्यापही होऊ शकलेली नाही व पुढे ती युती होण्याची शक्यता देखील तशी धूसरचं आहे. पण तरी देखील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी एक आशा लागून राहिलेली आहे. तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावं का? किंबहुना ते एकत्र येतील का? यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….