‘राजकुमार राव’च्या घराची का होतेय चर्चा?

राजकुमार रावने बॉलीवडूमध्ये स्वतःची एक खास ओळख तयार केलेली आहे. राजकुमारच्या हटके भूमिका आणि चित्रपट यामुळे तो कायम चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर राजकुमारची चर्चा होते आहे कारण मुंबई राजकुमारने एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतली आहे. जुहू परिसरात असणाऱ्या या अपार्टमेंटची किंमत ४४ कोटी रुपये आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये कोणती मोठी बातमी आहे. यातील खास बातमी अशी आहे ती अपार्टमेंट राजकुमार रावने जान्हवी कपूरकडून खरेदी केली आहे. जान्हवीने हे घर विकून कोटी कोटीचा नफासुद्धा कमवला आहे.

तुम्हाला आठवत असेल राजकुमार राव आणि जान्हवीने रूही चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांची उत्तम केमीस्ट्री पहायला मिळाली.आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. राजकुमारने खरेजी केलेल्या अपार्टमेंटबद्दल अशी माहिती हाती आली की जान्हवीने २ वर्षांपूर्वी ती अपार्टमेंट खरेदी केली होती. डिसेंबर २०२० मध्ये ३९ कोटी रुपयांचा व्यवहार त्यावेळी झाला होता असं बोलल जातं. राजकुमार रावने ही अपार्टमेंट ४४ कोटींमध्ये खरेदी केली आहे. त्यामुळे जान्हवीला तब्बला ५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या अपार्टमेंटमध्ये एका स्केअर फूटची किंमत १.२७ लाख एव्हढी आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.