रिकाम्या हाती मुंबईत आले अन् जाताना कुटुंबासाठी ठेवून गेले कोट्यवधींची संपत्ती!

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कायम लोकांना हसविणारा हा कॉमेडियन जाताना मात्र सगळ्यांना रडवून गेला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाकडून आणि चाहत्यांकडून आठवणींना उजाळा देण्यात येतोय.आय़ुष्यात प्रचंड संघर्ष करत त्यांनी स्वतःची ओळख तयार केली होती.

राजू श्रीवास्तव जेव्हा मुंबईत आले तेव्हा एका वयोवृद्ध महिलेकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. एका रुमचं भाडं ते द्यायचे. नंतर राजू श्रीवास्तव यांना काम मिळायला लागलं आणि त्यांनी दुसरीकडे फ्लॅट भाड्याने घेतला.त्यांनी मालाडमधील जनकल्याण नगरमध्ये २.५ लाखांमध्ये वन रुम किचन फ्लॅट विकत घेतला होता तो राजू श्रीवास्तव यांचा पहिला प्लॅट होता. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी विवाह केला तेव्हा ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूला मेरीगोल्ड बिल्डिंगमध्ये डबल बेडरुम फ्लॅट खरेदी केला होता.
२००५ मध्ये लाफ्टर चॅलेंजमुळे राजू श्रीवास्तव सुपरस्टार बनले आणि घराघरात त्यांनी चाहत्यांच्या मनात एक स्थान तयार केलं. या शोबरोबर ते इतरही शो करू लागले. राजू श्रीवास्तव त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी लोखंडवाला येथील समर्थ येथे दोन कोटी रुपयांत ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला. पुढे याच बिल्डिंगमध्ये राजू श्रीवास्तव यांनी पुन्हा एक फ्लॅट खरेदी केला. अशी माहिती हाती आली की श्रीवास्तव यांनी त्यांच्या लष्करातून निवृत्त झालेल्या भावालाही दिल्लीत घर खरेदी करून दिलं होतं. कानपूर आणि लखनऊ मध्येही श्रीवास्तव यांचे बंगले आहेत.
राजू श्रीवास्तव हे लोकप्रिय कॉमेडियन होते. एका शोसाठी ४ ते ५ लाख रुपये फी घेत होते. रिपोर्टसनुसार राजू श्रीवास्तव यांची नेटवर्थ २० कोटी रुपये इतकी आहे. त्याचबरोबर घरं आणि गावाकडेही अलिशान बंगला आहे. इनोव्हा, बीएमडब्ल्यू ३, ऑडी क्यू या महागड्या गाड्याही राजू श्रीवास्तव यांच्याकडे आहेत.