जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल !

आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा झटक असून सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जेव्हा जेव्हा राजू श्रीवास्तव कॅमेऱ्यासमोर यायचे तेव्हा लोकांना हसवायचे. जातानादेखील त्यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य सोडून गेले.
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये ते लोकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते लोकांना अगदी मजेदार पद्धतीने त्यांनी कोरोना कॉलर ट्यूनची आठवण करून दिली. या व्हिडीओत राजू श्रीवास्तव थोडेसे हसले आणि लोकांना उद्देशून म्हणाले, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळेच आता सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी वेगवेगळ्या अभिनेत्यांची कोरोना कॉलर ट्यूनच्या संदर्भात त्यांच्या आवाजाची मिमिक्री केली आहे. हा व्हिडीओही त्यांच्या इतर व्हिडीओ इतकाच मनोरंजक आहे.